ऑनलाइन टीम / सातारा :
जाणता राजा हा शब्द रामदास स्वामींनी आणला. रामदास स्वामी शिवरायांचे गुरू नाही असे खळबळजनक विधान राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले आहे. साताऱयातील एका कार्यक्रमात ते बोलत होते.
जाणता राजा या उपाधी सदंर्भात शरद पवार यांनी मोठे विधान केले आहे. ते म्हणाले, मला जाणता राजा म्हणा, असं मी म्हणालो नाही. तसेच जाणता राजा हा शब्द रामदास स्वामींनी आणला आहे. रामदास स्वामी शिवरायांचे गुरू नव्हते, तर राजमाता जिजाऊच शिवाजी महाराजांच्या गुरू आहे. असं ते म्हणाले आहे.









