मुंबई / ऑनलाईन टीम
देशासह राज्यात कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. राज्यात लस, ऑक्सिजन, बेड्सचा तुटवडा यावरून विरोधक व राज्य सरकार यांच्यात आरोपाची मालिकाच सुरू झाली आहे. भाजप नेत्यांकडून वारंवार राज्य सरकारवर टीका केली जात आहे. आरोपांचे नवीन सत्रच पाहिला मिळत आहेतच. आशावेळी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याबाबतीत शनिवारी बुलढाण्यात एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे ज्य़ामुळे ते चांगलेच चर्चेत आले आहेत.
बुलढाणा मतदारसंघाचे शिवसेना आमदार संजय गायकवाड म्हणले, केंद्रातील भाजपने राज्यसरकारला मदत करायचे सोडून बांगलादेश, पाकिस्तान, नेपाळला मदत केली आहे. गुजरातला इंजेक्शन मोफत वाटले. तर इंजेक्शन बनवणाऱ्या कंपन्यांना केंद्र सरकारवर टीका केली आहे. कोरोना काळात कोणीच राजकारण करु नये. त्याशिवाय तुम्ही तर सरकार पाडायला निघाले आहात. मात्र अगोदर माणसे जिवंत ठेवा, मगच राजकारण करा, असे आवाहनही त्यांनी भाजपला केलं.
यासोबतच ते शेवटी म्हणाले की, मला जर कोरोनाचे जंतू सापडले असते तर मी देवेंद्र फडणवीसांच्या तोडांत कोंबले असते, इतका तिरस्कार या लोकांबद्दल निर्माण झाला आहे. म्हणून राजकारण न करता राज्याला मदत केली पाहिजे. आधी महाराष्ट्र जगला पाहिजे, नंतर राजकारण आहे. माणसंच मेली तर कोण मतदान करणार आहे तुम्हाला, असा प्रश्न देखील संजय गायकवाड यांनी यावेळी विचारला.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








