मंत्री वडेट्टीवार यांच्यावर आमदार पडळकर यांचा प्रहार
आटपाडी / प्रतिनिधी
मुख्यमंत्र्यांना हरवलेली मंत्रीमंडळ उपसमिती शोधण्यासाठी टास्क फोर्सचं गठन करण्याची आमदार गोपीचंद पडळकर यांनी मागणी केल्यानंतर वादाला तोंड फुटले आहे. त्या पत्रावरून मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पडळकर यांना ‘गवत’ असे संबोधले होते. त्यावर प्रत्युत्तर देताना आमदार गोपीचंद पडळकर यांनी मंत्री वडेट्टीवार यांना ‘पावसाळ्यात उगवणारी छत्री’ अशी उपमा दिली आहे.
आमदार गोपीचंद पडळकर यांनी मंत्री विजय वडेट्टीवार यांना खुले पत्र लिहून त्यांच्यावर गंभीर आरोप केले तसेच मी दिलेल्या पत्रामुळे ‘निष्क्रीय दिग्गजांच्या मंत्रीमंडळ उपसमिती’मधून एका तरी मंत्र्याला जाग आली बरं आहे, असा टोला लगावला.
आमदार पडळकर म्हणाले, आपण म्हणता ते खरं आहे, कारण मला ओबीसी हिताकरिता स्थापन झालेल्या ‘महाज्योतीचे’ अध्यक्षपद फक्त मिरवण्याकरिता धारण करता आले नसते. किंबहूना मला आपल्यासारखे दहावी पास असतानासुद्धा उच्चशिक्षणासाठी विदेशात जाण्याकरिता खोट्या कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट प्राप्त करता आले नसते. आपल्या मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठी अत्यावश्यक असलेल्या गोसीखुर्द प्रकल्पात कंत्राटदारासोबत टक्केवारीने अंड्स्टॅडींग न झाल्याने त्यांच्याविरूद्ध तक्रारींचा पाऊस पाडता आला नसता.
किंबहूना आपल्यासारख्या दूरदृष्टीने स्वकीयांसाठी छत्तीसगडमध्ये आधी दारूची फॅक्टरी विकत घेऊन मगच कायदा व सुव्यवस्थेचे कारण देत चंद्रपूरमधून दारूबंदी उठवता आली नसती. तुमच्या प्रमाणे, मला दारूबंदीनंतर २३ लिकर शॅाप्सला भागीदारीने चंद्रपूरला स्थलांतरीत करता आले नसते. किंबहूना नागपूरला डिलरशीप घेऊन चंद्रपूरमधील विक्रेत्यांना फक्त तेथूनच दारू विकत घेण्याची अट घालता आली नसती. म्हणूनच मी आपल्या या अफाट कर्तृत्वापुढे आपल्या दृष्टीने अज्ञानी बालक असेल.
मला गवताची उपमा देण्याआधी आपण कधी पावसाळ्यात उगवलेल्या छत्रीशी ‘स्वआकलन’ केले आहे का? असो आपण आपली भाषा प्रस्थापितांच्या विरोधात वापरली असती तर ओबीसी समाजाच्या हिताचे कल्याण झाले असते, असे ही भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी म्हटले आहे.
Previous Articleजलसमाधी परिक्रमा यात्रा: नृसिंहवाडीला पोलीस छावणीचे स्वरूप
Abhijeet Khandekar
Meet Abhijeet Khandekar : a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. With a Master's degree in Journalism from Shivaji University, Abhijeet specializes in political news, entertainment, and local content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives. Connect with Abhijeet for collaborations and captivating content that informs and entertains.