प्रतिनिधी /बेळगाव
सन 2022 च्या जागतिक विस्ताराच्या योजनांचा भाग म्हणून मलबार गोल्ड जानेवारी महिन्यातच भारतात आणि परदेशात 22 नवीन शोरुम उघडतील. 22 नवीन शोरुम पैकी 10 भारतात असतील आणि उर्वरित पश्चिम आशिया आणि दक्षिण पूर्व आशियामध्ये असतील जिथे ब्रँडची आधीच उपस्थिती आहे.
या मोहिमेची सुरुवात 8 जानेवारीला बेंगळूरमधील एम जी रोड येथे आर्टिस्टरी कन्सेप्ट स्टोअरच्या शुभारंभाने होईल. आणि 30 जानेवारीला दिल्लीमधील प्रित विहार येथे 22 व्या शाखेचे उद्घाटन होईल.
विस्ताराच्या या नवीन टप्प्यासाठी समूह एकूण 800 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. जगातील सर्वात मोठी ज्वेलरी समूह बनण्याच्या उद्देशाने मलबार गोल्ड अँड डायमंडस् 750 स्टोअर्स उघडण्याचे आणि जगातील प्रथम क्रमांकाचे सोन्याचे रिटेलर बनण्याचे लक्ष्य ठेवत आहे. या विस्तार कार्यक्रमामुळे दागिन्यांच्या व्यापाराशी संबंधित किरकोळ, उत्पादन, तांत्रिक आणि व्यवस्थापन क्षेत्रात अंदाजे 5000 रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असे मलबार समूहाचे अध्यक्ष एम. पी. अहमद म्हणाले.
28 वर्षांच्या गौरवशाली प्रवासात मलबार गोल्ड मजबूत होत गेले आहे. जानेवारीमध्ये 22 शोरुम्स सुरू करून आम्ही नवीन वर्षाची प्रभावी सुरुवात करण्यास सज्ज आहेत. आम्हाला खात्री आहे की आमचे ग्राहक आमच्या सर्व नवीन शोरुममध्ये जागतिक दर्जाच्या दागिन्यांच्या खरेदीचा अनुभव घेतील आणि पारदर्शकता, विश्वास, गुणवत्ता आणि सेवेवर आधारित आमच्या मूल्यांची प्रशंसा करतील, असे मत खासदार आणि ग्रुपचे चेअरमन अहमद यांनी व्यक्त केले.









