प्रतिनिधी / शाहुवाडी
मलकापूर बाजार पेठेत वाढणारी गर्दी व संभाव्य कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन मलकापूर शहरात सोमवार 13 जुलै ते शुक्रवार 17 जुलै अखेर जनता संचारबंदी जाहीर केली आहे मलकापूर नगर परिषदेत व्यापारी व पालिका प्रशासन यांच्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून या कालावधीत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवले जाणार आहेत या जनता संचारबंदीला परिसरातील नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहनही करण्यात आले आहे.
मलकापूर नगर परिषद येथे नगराध्यक्ष अमोल केसरकर, उपनगराध्यक्ष प्रवीण प्रभावळकर नगरसेवक दिलीप पाटील , रमेश चांदणे, मुख्याधिकारी शीला पाटील यांच्या सह शहरातील व्यापारी यांच्यात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते शाहूवाडी तालुक्यात पुणे-मुंबई या ठिकाणावरून आलेल्यांची तपासणी केल्यानंतर कोरोनाची संख्या वाढू लागली होती परिणामी कोरोनाची धास्ती सर्वत्र दिसत होती लॉकडाउन उठल्यावनंतर मलकापूर बाजारपेठेत गर्दी वाढू लागली आहे. त्यातच कोरोना बाबत घ्यावयाच्या दक्षतेचा ही पुरता बोज वारा उडाला आहे मास्कचा वापर ही बहुतांशी पणे टाळला जात आहे तर सोशल डिस्ट्रक्शन चाही फज्जा उडत आहे.
कोरोनाचा संभाव्य धोका ओळखून मलकापुर शहरात कोरोनाचा शिरकाव होऊ नये याची खबरदारी म्हणून मलकापूर शहरातील व्यापारी यांची मलकापूर नगरपरिषदेत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी शहरात वाढती गर्दी लक्षात घेता त्याचबरोबर कोरोना बाबतच्या घ्यावयाच्या दक्षतेचा उडत असलेला बोजवारा याबाबत खबरदारी म्हणून मलकापूर शहरात सोमवार 13 जुलै ते शुक्रवार 17 जुलै अखेर अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद राहणार आहेत.
Previous Articleव्होडाफोन-आयडियाचीस्थिती नाजूक
Next Article जूनमध्ये इंधनाची 16.29 दशलक्ष टन विक्री








