प्रतिनिधी / शाहूवाडी
मलकापूर तालुका शाहूवाडी येथील श्री अपेश्वर कलेक्शन या कापड दुकानातील निंबाराम नानाजी देवासे वय तेवीस मुळगाव राज्यस्थान या युवकाने मलकापूर येथे दुकानातील मागील खोलीत गळफास लावून आत्महत्या केल्याची नोंद शाहूवाडी पोलिसात झाली आहे .आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.
पोलीसातून मिळालेल्या माहिती नुसार मलकापूर बाजारपेठेत श्री अपेश्वर कलेक्शन हे कापड दुकान असून या दुकानात तिघे जण कामाला आहेत पैकी दोघेजण शुक्रवारचे दुकान बंद असल्याने कोल्हापूर येथे खरेदीसाठी गेले होते खरेदी वरून आल्यानंतर दुकानाचा दरवाजा लवकर न उघडल्याने त्यांनी चौकशी केली असता निंबाराम देवासे यांने छताच्या पख्याला ओढणीने गळफास लावून घेतल्याचे दिसून आले याबाबत त्यांनी शाहूवाडी पोलिसात फिर्याद दिली असून घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र देशमुख यांनी भेट दिली पोलीस कॉन्स्टेबल रघुनाथ माने एस एस ढाले यांनी पंचनामा केला.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









