प्रतिनिधी / शाहुवाडी
मलकापूर तालुका शाहूवाडी येथे आदित्य मोबाईल शॉपी मध्ये गुरूवार १२ ऑगस्ट रोजी चोरी झाली यात सुमारे एक लाख नव्वद हजाराचा मुद्देमाल शाहूवाडी पोलिसांनी ताब्यात घेतला तर याच चोरीतील दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू असल्याची माहितीही पोलीस निरीक्षक विजय पाटील व सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र देशमुख यांनी दिली. जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे, अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, पोलीस उपअधिक्षक वैजणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास मोहीम राबवण्यात आली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मलकापूर येथील आदित्य मोबाईल शॉपी मध्ये गुरुवारी मध्यरात्री चोरी झाली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी कल्पेश नारायण वारंग वय 21 राहणार करूगंळे तालुका शाहूवाडी याला शाहूवाडी पोलिसांनी अवघ्या सहा तासातच सी सी टी व्ही फुटेजच्या माध्यमातून ताब्यात घेतले होते. सुरुवातीला मी चोरी केली नसल्याचे सदर आरोपी सांगत होता. मात्र नंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली व शेतात कोणालाही दिसणार नाही.
अशा ठिकाणी लपवलेला चोरीचा माल त्याच्याकडून हस्तगत करण्यात आला. चोरी प्रकरणी त्याला साथ देणार्या अन्य दुसरा एका साथीदाराचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांच्या वतीने देण्यात आली. या आरोपीकडून चोरीस गेलेले मोबाईल पावर बॅक, पेन ड्राईव्ह, ब्लूटूथ हॅन्डसेट, मेमरी कार्डव इतर ॲक्सेसरीज हा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दरम्यान आरोपीस 17 ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र देशमुख अधिक तपास करत आहेत.
दरम्यान व्यावसायिकांनी आपल्या दुकानातील सीसीटीव्ही अधिक कार्यान्वित ठेवावेत जेणेकरून अशा घटना घडल्यास तपास कामी त्याची बहुमोल मदत होत असल्याने व्यापारी वर्गाने याची विशेष खबरदारी घ्यावी असे आवाहनही यावेळी पोलीस निरीक्षक विजय पाटील यांनी केले. या पथकात शाहूवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रकाश कांबळे. माळी, कुंभार दिगंबर चले, दाभोळकर आदींच्या सह पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.









