शाहूवाडी / प्रतिनिधी
मलकापूर बाजार पेठेतील प्रवेशद्वारावरील गेटसमोर समोर दुचाकी वाहनांची होणारी गर्दी अखेर काढल्याने बाजारपेठेत जाणाऱ्या प्रवाशांना सोयीचे झाल्याने नागरिकांच्यातून समाधान व्यक्त होत आहे ही कारवाईची मोहीम अखेरपर्यंत रहावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे तरूण भारतने या बाबत बातमी लावली होती
शाहूवाडी तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याच्या पार्श्वभूमीवर मलकापूर नगरपरिषदेने विशेष दक्षता घेतली आहे. शहरातील बाजारपेठेत गर्दी होणार नाही. यासाठी प्रवेशद्वारावर बॅरिकेट लावण्यात आली आहेत, जेणेकरून दुचाकी व अन्य वाहने आत जाणार नाहीत मात्र त्याच बॅरेकॅटला गाड्यांचा विळखा पडत होता याबाबत तरुण भारतने वाहतूककोंडी सुटणार का याबाबत बातमी प्रसिद्ध केली होती याची दखल घेऊन गेट समोरील दुचाकी वाहने लावण्यास बंदी घातल्याने बाजारपेठेत जाण्यासाठी नागरीकना सोयीच झाल आहे. बेशिस्त वाहन पार्क करत आहेत. यांच्यावर कारवाईची मोहीम सुरू केली आहे.
दरम्यान दुचाकी चालकांनीही गाडी पार्क करतांना आपली जबाबदारी ओळखून वाहतूक कोंडी व त्याच बरोबर नागरिकांना त्रास होणार नाही अशा ठिकाणी गाड्या पार्क केल्या तर पोलीस प्रशासनाबरोबरच पालिका प्रशासनाला ही सहकार्य होणार आहे. मात्र दुचाकीस्वारांनी जबाबदारी घेतली पाहिजे अशी चर्चा नागरिकातून पुढे येत आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








