शाहुवाडी /प्रतिनिधी
मलकापूर नगरपरीषदेच्या उपनगराध्यक्षपदी सत्ताधारी भाजपा, जनसुराज्य व राष्ट्रीय दलित महासंघ आघाडीचे व जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य प्रविण प्रभाकर प्रभावळकर याची बिनविरोध निवड झाली. निवड सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष अमोल केसरकर हे होते.
सत्ताधारी आघाडीच्या उपनगराध्यक्षा सोनिया शेंडे यांनी आघाडीत ठरलेल्या निर्णयानुसार राजीनामा दिल्याने उपनगराध्यक्ष पदाच्या रिक्त जागेसाठी आज पालिका सभागृहामध्ये विशेष सभेच आयोजन करण्यात आले होते. विरोधी आघाडीकडून उमेदवारी अर्ज भरला नसल्याने सत्ताधारी आघाडीकडून केवळ प्रविण प्रभावळकर यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. शहरातील प्रलंबित कामांसह पालेश्वर पाणी योजनेस गती देणार असल्याचे मत व्यक्त केले. निवड प्रसंगी सत्ताधारी आघाडीसह विरोधी आघाडीचे नगरसेवक उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








