बेळगावच्या युवकांकडून महिपाळगड येथे आयोजन : भाला कौशल्याचेही सादरीकरण
प्रतिनिधी /बेळगाव
शौर्याचे प्रतीक असणाऱया छत्रपती शिवाजी महाराजांनी मर्दानी खेळांचा वापर युद्धासाठी करून घेतला. हे मर्दानी खेळ नवीन पिढीपर्यंत पोहोचावेत या उद्देशाने बेळगाव येथील शिवनिश्चय तालीम यांच्यावतीने महिपाळगड, ता. चंदगड येथे शिवजयंतीनिमित्त मर्दानी खेळांच्या प्रात्यक्षिकांचे आयोजन केले होते.
महिपाळगड येथे मोठय़ा उत्साहात शनिवारी शिवजयंती साजरी करण्यात आली. येथील ग्रामस्थ व आसपासच्या नागरिकांनी पारंपरिक पद्धतीने शिवजयंती साजरी केली. बेळगावच्या बालचमूने लाठीकाठीचे प्रात्यक्षिक सर्वांसमोर सादर करून उपस्थितांच्या टाळय़ा मिळविल्या. लाठीकाठी सोबतच भाला कौशल्याचेही सादरीकरण करण्यात आले. सूरज बिर्जे, व्यंकटेश देवगेकर, अभी लोहार यांच्या मार्गदर्शनाखाली ऋतुजा काटकर व श्रावणी पेडणेकर यांनी प्रात्यक्षिके सादर केली. प्रात्यक्षिके पाहण्यासाठी महिपाळगडावर मोठी गर्दी झाली होती.