प्रतिनिधी/ बेळगाव
येथील मर्कंटाईल सोसायटीने बेळगाव शहरात आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे. सहकार क्षेत्रात सुरू असलेले त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे, असे नाटय़, चित्रपट व दूरदर्शन मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री अंशुमाला पाटील यांनी सांगितले.
एका कार्यक्रमासाठी त्या बेळगावात आल्या होत्या. त्यांनी मर्कंटाईल को-ऑप. सोसायटीला सदिच्छा भेट दिली. यावेळी सोसायटीचे चेअरमन संजय मोरे यांनी त्यांचे स्वागत करून संस्थेच्या कार्याची माहिती दिली. संस्थेने 21 वर्षे पूर्ण केली असून लवकरच ही संस्था रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करणार आहे. या संस्थेची भरभराट व्हावी, अशा शुभेच्छा अंशुमाला यांनी दिल्या. यावेळी त्यांच्या समवेत सहकलाकार, संस्थेचा संचालकवर्ग व कर्मचारी उपस्थित होते.









