बेळगाव :
येथील मर्कंटाईल को-ऑप. सोसायटी आणि मर्कंटाईल सेवा संघाच्यावतीने दरवर्षी घेतला जाणारा ‘स्वर संध्या’ हा कार्यक्रम यंदा 13 व 14 फेब्रुवारी रोजी रामनाथ मंगल कार्यालयात होणार आहे.
प्रख्यात गायक महेश काळे यांच्या गायनाचा कार्यक्रम दि. 13 रोजी आणि मिलिंद इंगळेंसोबत किशोर कुमार (सौमित्र), समीरा गुजरजोशी यांच्या गायनाचा कार्यक्रम दिनांक 14 रोजी होणार आहे. बेळगावकरांच्यादृष्टीने ही मैफल अविस्मरणीय ठरणार आहे. सर्वांसाठी हा कार्यक्रम मोफत असल्याने या कार्यक्रमास नागरिकांनी आवर्जून उपस्थित राहावे, अशी विनंती मर्कंटाईल सोसायटीचे चेअरमन संजय मोरे यांनी केली आहे.
आजवर अशा अनेक दिग्गज गायकांनी मर्कंटाईलच्या स्वरसंध्यामध्ये हजेरी लावली असून गतसाली पद्मजा फेणाणी जोगळेकर या हिंदू क्लासिकल गायिका आणि उर्मिला धनगर या मराठीतील ख्यातनाम गायिकांनी उपस्थित राहून रसिकांना मंत्रमुग्ध केले होते.









