मराठी भाषा दिन-संमेलनाचे एकत्र नियोजन : गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीच्या बैठकीत निर्णय
प्रतिनिधी / बेळगाव
गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीची बैठक मराठी विद्यानिकेतन बेळगाव येथे दि. 22 जानेवारी रोजी मोठय़ा उत्साहात संपन्न झाली. यावेळी 20 वे मराठी बालसाहित्य संमेलन व मराठी भाषा दिन कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले.
बैठकीच्या सुरुवातीला सामाजिक, राजकीय, साहित्यिक क्षेत्रातील दिवंगत व्यक्ती, खासदार सुरेश अंगडी, ज्ये÷ पत्रकार अशोक याळगी, एस. पी. बालसुब्रम्हण्यम्, आशा लता, शिक्षणतज्ञ लीलाताई पाटील, लता साठे, शिवाजी ओऊळकर, गोविंद उसुलकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
बैठकीचे प्रास्ताविक व स्वागत प्रबोधिनीचे अध्यक्ष जयंत नार्वेकर यांनी केले. यावषी कोरोनामुळे प्रबोधिनीचे अनेक कार्यक्रम रद्द करावे लागले. पण प्रबोधिनीतर्फे घेण्यात येणारे बालसाहित्य संमेलन व मराठी भाषा दिन कार्यक्रम कोरोना परिस्थितीचे सर्व नियम पाळून आयोजित करण्याचे ठरले.
यावेळी या दोन्ही कार्यक्रमांचे आयोजन दि. 27 फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे. बालसाहित्य संमेलनाचे हे 20 वे वर्ष आहे. बेळगावचे प्रसिद्ध कवी कृ. ब. निकुंब यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यामुळे साहित्यनगरीला कवी कृ. ब. निकुंब साहित्यनगर असे नाव देण्यात येणार आहे.
या साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष म्हणून प्रा. डॉ. चंद्रकांत पोतदार (यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, हलकर्णी) यांची निवड करण्यात आली. उद्घाटक म्हणून डॉ. केदार सामजी हे उपस्थित राहणार आहेत.
संमेलनामध्ये कथाकथन, कवी संमेलन व कवी कृ. ब. निकुंब यांच्या कवितांवर आधारित संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. कथाकथन या सत्रासाठी बालकथाकारांची निवड करण्यासाठी दि. 19 फेब्रुवारी रोजी मराठी विद्यानिकेतन येथे कथाकथन स्पर्धा घेण्यात येणार आहे. यामध्ये 5 वी ते 10 वी पर्यंतचे विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. त्याचबरोबर कवी संमेलनासाठी विद्यार्थ्यांनी स्वरचित कविता पाठविण्याचे आवाहनही प्रबोधिनीतर्फे करण्यात आले आहे.
कृ. ब. निकुंब साहित्यनगर, स्कूल ऑफ कल्चर येथे हे संमेलन सकाळच्या सत्रात संपन्न होणार आहे. बालसाहित्य संमेलन आणि कविवर्य कुसुमाग्रजांचा जन्मदिवस म्हणजेच मराठी भाषा दिन हे दोन्ही कार्यक्रम उत्साहात साजरे करण्याचा निर्धार प्रबोधिनीतर्फे करण्यात आला आहे. यांनी आभार मानले.