ऑनलाईन टीम / हैदराबाद :
मराठी आणि बॉलीवूड सिनेदिग्दर्शक निशिकांत कामत यांचे निधन झाले आहे. ते 50 वर्षांचे होते. हैदराबादच्या एआयजी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
मिळालेल्या माहितीनुसार, जुलै महिन्यात कावीळ आणि पोट दुखीच्या त्रासामुळे हैदराबाद येथील गचीबोवली स्थित एआयजी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. यावेळी त्यांना क्रॉनिक लिव्हर डिसीज आणि अन्य आजारांचे संक्रमण झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार चालू होते. मात्र आज उपचारा दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
निशिकांत कामत हे बॉलीवूडमधील नावाजलेल्या दिग्दर्शकांपैकी एक नाव आहे. मुंबई मेरी जान या चित्रपटातून त्यांनी हिंदी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले होते. त्यानंतर त्यांचे दृश्यम, मदारी यासारखे हिंदी तर लय भारी, डोंबिवली फास्ट यासारख्या मराठी चित्रपटांचे त्यांनी दिग्दर्शन केले होते. तर भावेश जोशी या सिनेमात काम देखील केले होते.
तर जॉन अब्राहम याच्या रॉकी हँडसम या चित्रपटात त्यांनी रंगवलेला खलनायक खूप गाजला होता.