वार्ताहर / कुकुडवाड :
अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे तिसरे राज्यस्तरीय अधिवेशन 19 नोव्हेंबर रोजी म्हसवड येथील तृप्ती मंगल कार्यालयात होणार आहे. दलित चळवळीचे सामाजिक कार्यकर्ते महादेव सोपान सरतापे यांनी यासंदर्भात माहिती दिली.
सरतापे म्हणाले, म्हसवड येथे होणाऱ्या तिसऱ्या राज्यस्तरीय अधिवेशनाचे अध्यक्षपद खासदार श्रीनिवास पाटील भूषविणार आहेत. गौतम सरतापे संमेलनाचे स्वागताध्यक्ष असतील. संमेलनाचे उदघाटन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू राजरत्न आंबेडकर यांच्या हस्ते होईल. मुख्य अतिथी म्हणून राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, मराठी भाषा मंत्री विश्वजीत कदम, माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे उपस्थित राहणार आहेत. प्रमुख मार्गदर्शक म्हणून जेष्ठ विचारवंत व माजी न्यायाधीश रावसाहेब झोडगे उपस्थित राहणार आहेत. संमेलनात जेष्ठ साहित्यिक डॉ.जयप्रकाश घुमटकर, कवियत्री रेखा दीक्षित,ललिता गवंदे, नीलिमा जोशी यांची विशेष उपस्थिती असेल.
या संमेलनात राज्यभरातून नामवंत लेखक, कवी, साहित्यिक यांची मांदियाळी असेल.









