पराक्रमी पूर्वजांना अभिवादन करण्यासाठी पानिपतावर दुचाकी मोहिम जाणार
प्रतिनिधी/ सातारा
पुणे ते पानिपत आणि पानिपत ते पुणे अशी दुचाकी मोहिम आखण्यात अली आहे. दि. 6 जानेवारीला पुण्यातील शनिवार वाडा येथून ही मोहिम रवाना होणार असून पुढे ही मोहिम 14 जानेवारीला पानिपत येथे पोहचणार आहे. तेथून परतीच्या प्रवासाला ज्योत घेवून निघणार असून दि. 26 जानेवारीला पुण्यात पोहचणार आहे. या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 260 वर्षापूर्वी मराठय़ांच्या फौजा ज्या मार्गाने गेल्या होत्या. त्याच मार्गाने जाणार आहे.
पानिपताचे युद्ध हे प्रत्येक मराठी मनाची भळभळती जखम असल्याने पानिपताचा उल्लेख होताच प्रत्येकाच्या चित्तवृत्ती फुलून येतात. छाती रुंदावते. बाहु विस्तारतात. पानिपताचे तिसरे युद्ध ही आपली हार नसून मराठय़ांच्या इतिहासातील सर्वोंच्च पराक्रमाची गाथा आहे. आपल्या कर्तत्वशाली पूर्वजांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पानिपताच्या युद्धाच्या 161 व्या वर्षात सशक्त भारत या संकल्प समुहाने पुणे ते पानिपत दुचाकी अभिवादन मोहिमेची आखणी केली आहे. श्री. शनिवारवाडय़ाच्या मैदानातून दि. 6 रोजी ही मोहिम सुरु होणार आहे. 260 वर्षापूर्वी मराठय़ांच्या फौजा ज्या मार्गाने केल्या त्याच मार्गाने प्रवास करत 14 जानेवारी 2022 ला पानिपतवर राष्ट्रसमर्पण जागरण सभा घेवून संपेल. परतीच्या मार्गात पानिपतावर प्रज्ललित केलेली शौर्यज्योत घेवून 1 हजार 670 किमीचे अंतर केवळ 13 च दिवसात धावत पार करुन आपल्या दैदीप्यमान पराक्रम करणाऱया पूर्वजांचे यथोचित स्मारक चिंरंतन ज्योतीच्या रुपाने प्रजासत्ताक दिनी दि. 26 रोजी पुण्यात स्थापित केले जाईल. पुणे ते पानिपत व परत पुणे अशा संपूर्ण मोहिम मार्गात 37 भुईंकोट, 7 गिरीदुर्गाचे सखोल अद्ययन करताना 27 तीर्थक्षेत्राचे दर्शन घेतले जाणार आहे. या मोहिमेत सहभागी होवू इच्छिणाऱयांनी सुधीर 9623138999, योगेश 8879124213 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.








