प्रतिनिधी / बेळगाव
मराठी भाषा प्रेमी मंडळ, बेळगाव या संस्थेची बैठक नुकतीच लोकमान्य रंगमंदिर येथे खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. प्रथम कार्याध्यक्ष नितीन कपिलेश्वरकर यांनी गत दोन वर्षांच्या कालावधीत घडलेल्या घटना विषद केल्या. या काळात मयत झालेल्या सदस्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
बृहन्महाराष्ट्र मंडळ, नवी दिल्ली आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विभागातर्फे राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या सहयोगाने राबविलेल्या कार्यक्रमांचा आढावा घेतला. नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. नवनिर्वाचित सर्व कार्यकारिणी सदस्यांना गुलाबपुष्प देऊन सन्मानित केले.
नूतन कार्यकारिणीचे अध्यक्ष अनिल चौधरी, उपाध्यक्षा नीता कुलकर्णी, कार्याध्यक्ष नितीन कपिलेश्वरकर, सचिव परशराम माळी, उपसचिव दिलीप सोहनी, खजिनदार अशोक केळकर, उपखजिनदार मकरंद बापट, कार्यकारिणी सदस्य संकेत कुलकर्णी, विजय तमुचे, बापूसाहेब देसाई, श्रीधर (बापू) जाधव, गुरुनाथ पेडणेकर, गजानन राणे, कुमार पाटील, सुधीर शेंडे, दत्ता नाडगौडा, अविनाश कुलकर्णी, प्रिया होर्तिकर, सुनीता पाटणकर यांची निवड करण्यात
आली.









