प्रतिनिधी / कोल्हापूर
प्रवास वर्णन आणि संशोधनाअंती मराठी पोवाड्यांविषयी लिहलेली पुस्तके मराठी साहित्य क्षेत्रात दिशादर्शक आहेत. विद्यापीठातील मराठी अधिविभागाचे केवळ शिक्षकच नव्हे, तर विद्यार्थी सुद्धा लिहीताहेत, ही अभिमानाची बाब आहे, असे गौरवोद्गार शिवाजी विद्यापीठाचे माजी परीक्षा नियंत्रक डॉ. बी. एम. हिर्डेकर यांनी काढले.
शिवाजी विद्यापीठ आणि महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा पंधरवडा साजरा होत आहे. या कार्यक्रमांतर्गत लेखक विष्णू पावले यांच्या पधारो म्हारो देस' आणि डॉ. सयाजी गायकवाड यांच्यामराठी पोवाडा (तीन भाग)’ या पुस्तक प्रकाशनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के होते. प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांची प्रमुख उपस्थित होती.पधारो म्हारो देस' डॉ. हिर्डेकर म्हणाले, पावले यांनी पधारो म्हारो देस या प्रवास वर्णनात ओघवती भाषा, नर्मविनोदी शैली अधूनमधून डोकावते. त्यांच्या भाषेचा बाज उत्तम आहे. डॉ. गायकवाड यांनीमराठी पोवाडा (तीन भाग)’ या ग्रंथाच्या निर्मितीमुळे पोवाड्याचा इतिहास, वर्तमान आणि भविष्य असा सर्वंकष दस्तावेज मराठी समाजाच्या हाती आला आहे. अध्यक्षस्थानावरून कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के म्हणाले, दोन्ही ग्रंथांचे विषय वेगवेगळे असले तरी मराठी अधिविभागाच्या माजी विद्यार्थ्यांनी लिहले आहेत, याबद्दल कौतुक केले. मराठी अधिविभागप्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. नंदकुमार मोरे यांनी आभार मानले. सुश्मिता खुटाळे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, उपकुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, लेखक विष्णू पावले, डॉ. सयाजीराव गायकवाड आदी उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









