ऑनलाईन टीम
मराठा आरक्षण प्रश्नी राज्य सरकारची पूर्वतयारी, इच्छाशक्ती आणि समन्वय नव्हता. त्यामुळेच उच्च न्यायालयात टिकलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकले नाही, असा घणाघात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर केला आहे. मराठा आरक्षण रद्द झाल्याने राज्यातील मराठा समाज महाविकास आघाडी सरकारला माफ करणार नाही, असेही पाटील यांनी म्हटले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर महाराष्ट्रातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. यावर बोलताना केवळ वकिलांची तगडी फौज देऊन उपयोग नाही. आरक्षण प्रश्नात राज्यातील सत्ताधाऱ्यांची भूमिका महत्त्वाची होती, असेही पाटील यांनी म्हटले आहे. मराठा समाजाने यावर काय प्रतिक्रिया द्यायचे हे त्यांनीच ठरवावे. तसेच राज्य सरकारने आता पुढे काय निर्णय घ्यायचा हे ठरवावे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
मागासवर्गाचा अहवाल कसा योग्य आहे, हे आपण उच्च न्यायालयात सांगू शकलो. मात्र, आपले वकील सर्वोच्च न्यायालयात सांगू शकले नाहीत, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. मराठा समाजाशी महाराष्ट्रातील सरकारने द्रोह केला असून त्यांना मराठा समाज माफ करणार नाही, असे पाटील म्हणाले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








