राज्य सरकारने ठोस पावले उचलावीत – एकमुखी मागणी
प्रतिनिधी / गारगोटी
मराठा समाजाच्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर मराठा समाजात असंतोष पसरला असून न्यायालयात बाजू मांडण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे, आरक्षणासाठी राज्य सरकारने ठोस पावले उचलावीत यासाठी पुन्हा भुदरगड तालुका सकल मराठा समाजाकडून पुन्हा आंदोलन छेडणार असलेचे यावेळी जाहीर करणेत आले.
मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे मराठा समाजाने पुन्हा एकदा वज्रमूठ बांधली असून गारगोटी येथील शाहू वाचनालय येथे समाजाची बैठक संपन्न झाली. या वेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टिंगशनचे पालन करत ही बैठक झाली. या बैठकीमध्ये सुप्रिम कोर्टामध्ये आरक्षण खटल्याची मांडणी गांभीर्याने करण्यात आली नाही. याबद्दल महाराष्ट्र शासनाचा मराठा समाजाच्या वतीने निषेध करण्यात आला.
आजच्या बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात आली. सोमवार दि १४ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता क्रांतीज्योत गारगोटी येथे भुदरगड तालुका सकल मराठा समाज सर्व विद्यार्थी, समाजातील नेते, भुदरगड तालुका समन्वयक समिती यांनी एकत्र येणेचे ठरले आहे. महाविद्यालयीन प्रवेशाच्या पार्श्र्वभूमीवर मराठा विद्यार्थ्यांना फी माफी दिलीच पाहिजे व जी मेगाभरती प्रस्तावित आहे. ती थांबलीच पाहिजे. या मागणीसाठी व शासनाला जाब विचारण्यासाठी हजारोंच्या संख्येने हजर राहा असे आवाहन सकल मराठा समाज भुदरगड तालुका अध्यक्ष नंदकुमार शिंदे यांनी केले. सचिन भांदिगरे यांनी प्रास्ताविक केले.
या बैठकीसाठी राहुल देसाई, अर्जुन आबिटकर,प्रविणसिंह सावंत, सचिनबाबा देसाई,शरद मोरे, अविनाश शिंदे,राजू चिले,अलकेश कांदळकर,संग्राम सावंत,संग्राम जाधव, रणधीर शिंदे, सकल मराठा समन्वयक समितीचे शशिकांत पाटील, सतीश जाधव, तुकाराम देसाई, शैलेश गुंड, मच्छिंद्र मुगडे,संदिपराज देसाई आदी उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









