बेळगाव / प्रतिनिधी
मराठा जागृती निर्माण संघातर्फे अभियंता दिन उत्साहात साजरा करण्यात आला. टिळकवाडी येथील लिओ अभियंता सभागृहात हा कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी गोपाळराव बिर्जे होते. प्रारंभी भारनरत्न एम. विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून वंदन करण्यात आले.
यावेळी अभियंते अमित कळसकर, जयदीप बिर्जे, कलमेश कुलकर्णी, आनंद चत्तुर, पराग सुतार, अश्विन दड्डीकर यांचे नेताजी जावध, प्रभाकर भाकोजी, अनंत लाड, वनिता बिर्जे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. अरुणाचल प्रदेशमधून एम. टेक द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेली श्रद्धा लोहार हिचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी बोलताना जयदीप बिर्जे म्हणाले, अभियांत्रिकी शिक्षणाला प्रचंड प्रमाणात वाव आहे. आपले कौशल्य दाखविण्याचे हे क्षेत्र आहे. सततचे प्रयत्न आणि कौशल्याच्या आधारावर अभियंता घडतो, असे सांगितले.
यावेळी वनिता बिर्जे, माजी नगरसेवक नेताजी जाधव, प्रभाकर भाकोजी आदी उपस्थित होते.









