प्रतिनिधी/सांगली
मराठा क्रांती मोर्चा सांगली यांचा तर्फे मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याच्या निषेधार्थ आज, मंगळवारी भर पावसात सांगली मिरजेच्या आमदारांच्या दारात हलगी बजाव आंदोलन करण्यात आले. मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक विलास देसाई डॉ संजय पाटील, नितीन चव्हाण आणि मराठा समाजाचे पदाधिकारी यांनी हे आंदोलन केले.
आमदार सुरेश खाडे यांच्या विश्रामबाग येथील निवासस्थाना समोर आणि त्यानंतर आमदार सुधीर गाडगीळ यांच्या विश्रामबाग येथील कार्यलयासमोर हे आंदोलन करण्यात आले. यापुढेही जिल्हाभर प्रत्येक आमदार, खासदारांच्या दारात असेच आंदोलन केले जाणार असून त्या त्या तालुक्यातील क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते त्याचे नियोजन करत असल्याचे मराठा क्रांती मोर्चा चे राज्य समन्वयक विलास देसाई यांनी सांगितले.
मराठा समाजाला तातडीने आरक्षण दिलेच पाहिजे या मागणीसाठी आंदोलन सुरूच ठेवणार आहे असे ही त्यानी सांगितले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








