ऑनलाईन टीम
संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या मराठा आरक्षणप्रश्नी सर्वोच्च न्यायालयाने आज महत्त्वपूर्ण निकाल दिला. सर्वोच्च न्यायालयाने तुर्तास मराठा आरक्षण रद्द ठरवले असून मराठा आरक्षण कायदाही रद्द केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर खासदार संभाजीराजे यांनी मराठा समाज बांधवांना संयम राखण्याचे आवाहन केले आहे. सध्या देशावर कोरोनाचे संकट असून या काळात आपल्याला माणसांचे जीव वाचवणे महत्त्वाचे आहे, असे त्यांनी म्हटलंय.
सध्याची कोरोनाची स्थिती भयानक आहे. अशा परिस्थितीत मराठा समाजाचा उद्रेक होणे योग्य ठरणार नाही. आरक्षण घेण्यासाठी आधी आपण जिवंत राहिले पाहिजे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत मराठा समाजाने कोणतेही टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहन संभीजीराजे यांनी केले.
तसेच मराठा आरक्षण टिकवण्यासाठी फडणवीस सरकारप्रमाणे ठाकरे सरकारनेही सर्वतोपरी प्रयत्न केले. त्यामुळे आता कोणालाही दोष देण्यात अर्थ नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा मी आदर करतो. परंतु, आजचा दिवस मराठा समाजासाठी दुर्दैवी आहे, असे संभाजीराजे म्हणाले.
Previous Articleम. ए. समिती सुरू करणार कोविड आयसोलेशन सेंटर
Next Article देशातील सक्रिय रुग्णसंख्या 35 लाखांसमीप








