मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने केली नाक्यावर निदर्शने
प्रतिनिधी / सातारा :
कोपर्डीच्या ताईवर अत्याचार झाल्याच्या घटनेनंतर राज्यभरात मराठा क्रांती मोर्चाची मशाल वेगाने पेटली. अगदी त्यावेळी तात्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार कोसळेल, अशी स्थिती निर्माण झाली होती. 3 ऑक्टोबर 2016 ला साताऱ्यात विराट मोर्चा काढला होता. त्यानंतर अनेक आंदोलने झाली होती. बुधवारी मात्र सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाने मराठय़ांकरता दिलेले आरक्षण रद्द करण्यात आले. त्याचा निषेध साताऱ्यातील पोवई नाक्यावर करण्यात आला.
3 ऑक्टोबर 2016 ला पोवई नाक्यावर विराट मोर्चा काढण्यात आला होता.शासनाने नेमलेल्या गायकवाड अहवालासमोर अनेक मराठय़ांनी उपस्थित राहून आपल्या प्रतिक्रियाही दिल्या होत्या. आंदोलनामध्ये अनेकांवर गुन्हे दाखल होते. आज मात्र उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला झटका देताच साताऱ्यातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. पोवई नाक्यावर मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी निदर्शने करुन आपला रोष व्यक्त केला. सरकारच्या विरोधात नाराजी व्यक्त करण्यात आली.









