तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
मराठा आरक्षण स्थगितीपूर्वी उपकेंद्र सहायक भरती प्रक्रिया अंतिम टप्पात असलेल्या विद्यार्थ्यांना नियुक्त्या मिळाव्यात,या मागणीसाठी सकल मराठा समाजाने पून्हा रस्त्यावर उतरून निदर्शने केली. दरम्यान आज बुधवारी शहरातील जुनी मिल कंपाउंड महावितरण अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर सकल मराठा समाजाच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली.
सकल मराठा समाजाच्या वतीने आज महावितरण कार्यालयासमोर करण्यात आलेल्या निदर्शनात मराठा बांधवानी आक्रमक होत ,घोषणाबाजी केली.छत्रपती शिवाजी महाराज की जय,एक मराठा लाख मराठा,तुमचं आमच नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय,आरक्षण आमच्या हक्काचं,नाही कुणाच्या बापाचं,असं ,कसं देत नाही,घेतल्या शिवाय राहत नाही,अशा घोषणांनी पारिसर दणाणून गेला होता.यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.
हे आंदोलन सकल मराठाचे समन्वयक माऊली पवार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी भाऊसाहेब रोडगे, प्रियंका डोंगरे, एडवोकेट श्रीरंग काळे, संतोष गायकवाड, अश्विनी भोसले यांच्यासह मराठा समाजाचे विद्यार्थी, पदाधिकारी, बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमच्या नोकरीचा प्रश्न सोडवा
माझा महावितरण व मुबई मेट्रो मध्ये सिलेक्शन झाले होते,पूर्ण कागदपत्रे तपासण्यात आली.परंतु आता या ठिकाणी कोरोनाचा व मराठा आरक्षण स्थगितीची करणे देत आम्हला डावलण्यात आले आहे.त्यामुळे सरकारने मराठा तरुणांवर अन्याय न करता ,आमच्या नियुक्त्या कराव्यात.
-सूरज सुरवसे( विद्यार्थी), सोलापूर









