ऑनलाईन टीम
आरक्षणासह मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने कोल्हापुरात चक्का जाम आंदोलन करण्यात आले आहे. छत्रपती ताराराणी चौकात हे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनात भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्यासह मराठा बांधव, कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थितीती लावली आहे. यामुळे या मार्गावरील वाहतूक खोळबंली आहे.
यावेळी आंदोलक मराठा समाज बांधवांनी सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी देत संताप व्यक्त केला. आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, या सरकारचे करायचं काय खाली डोकं वर पाय, एक मराठा लाख मराठा अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.









