प्रतिनिधी/अक्कलकोट
सर्वोच्च न्यालयाने मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिल्यानंतर पुन्हा एकदा मराठा क्रांती मोर्चाने आंदोलनाचा निर्णय घेतला, त्यानुसार आरक्षणाचा न्यायालयीन तिढा सोडविण्याची मागणी करुन सोमवारी अक्कलकोट बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कडकडीत बंदला विविध पक्षीय नेते, विविध समाजाच्या संघटना, व्यापारी संघटना यांनी पाठिंबा दिला होता. निघालेल्या मोर्चात सकल मराठा समाजासह विविध जातीधर्मांचे सहभागी झालेले होते. शहरातील प्रमुख मार्गावरुन निघालेल्या विराट मोर्चात हजारोंच्या संख्येने युवक वर्ग सामील झाले होते.
दरम्यान राजे फत्तेसिंह चौकातील श्री फत्तेसिंह शिक्षण संस्थेच्या सर्जेराव जाधव सभागृहात विविध पक्षीय नेते, विविध समाजाच्या संघटना, व्यापारी संघटना एकत्र आले. यावेळी उपस्थितांच्या हस्ते श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. मोर्चापूर्वी समाज बांधव स्व.सुनिल घाटगे यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. त्यानंतर सर्जेराव जाधव पथ, समर्थ चौक, सोन्या मारुती चौक, तूप चौक, वीर सावरकर चौक, मेन रोड, कारंजा चौक, तारामाता चौक, विजय कामगार चौक, बुधवार पेठ, श्री मल्लिकार्जुन मंदिर मार्गे, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बसस्थानक ते कांदा बाजार, ए-वन चौक, श्री कमलाराजे चौक मार्गे जुना तहसिल कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला.
याप्रसंगी जय भवानी, जय शिवराय, आरक्षण आमच्या हक्कांच…!, एक मराठा, लाख मराठा, कोण म्हणंत देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, यासह केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देण्यात आली. या घोषणेने संपूर्ण शहर परिसर दणदणून गेला होता. सोमवारी अक्कलकोट शहराचा आठवडा बाजाराचा दिवस मात्र सकाळपासूनच बाजार पेठेत सन्नाटा पसरला होता.
सदरचा मोर्चा जुना तहसिल कार्यालय येथे सभेत रुपांतर होवून यावेळी बोलताना तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष दिलीप सिध्दे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळालाच पाहिजे असे सिध्दे म्हणाले. शिवसेना शहर प्रमुख योगेश पवार यांनी आरक्षणाकरिता केंद्र व राज्य सरकारने त्वरीत कार्यवाही करण्याची मागणी यावेळी केली. आरपीआय आठवले गटाचे ता.अध्यक्ष अविनाश मडिखांबे व प्रा.राहुल रुही यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मराठा समाजाच्या आरक्षण दिले मात्र या सरकारला टिकविता आले नसल्याची टीका यावेळी केली. रासप जिल्हा अध्यक्ष सुनिल बंडगर यांनी मराठा समाजाला त्यांच्या अक्काचे आरक्षण मिळालाच पाहिजे असे बंडगर म्हणाले. लहुजी शक्तीसेनेचे जिल्हाध्यक्ष वसंत देडे यांनी मातंग समाज मराठा समाजाच्या हाकेला कायमच धावून येईल असे म्हणाले. वडार समाजाचे तालुका अध्यक्ष अंकुश चौगुले यांनी मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी वडार समाज कायम सोबत राहील असे सांगितले. सिध्देश्वर माळी यांनी महाराष्ट्र माळी समाज महासंघाचा मराठा आरक्षणाकरिता केंद्र व राज्य सरकारने निर्णय घेण्याची मागणी केली. यावेळी जैन समाज संघटनेचे अभय खोबरे, बेलदार समाजाचे अशोक जाधव, वागदरी येथील श्री परमेश्वर आराधना पर्व पालखी महोत्सव समिती व लिंगायत समाज, महाराष्ट्र नाभिक महामंडळ, वंचित बहुजन आघाडी, रासप यांचाही पाठिंबा देण्यात आला होता. यावेळी नायब तहसिलदार बालाजी बनसोडे यांना निवेदन सादर करण्यात आले.
या मोर्चादरम्यान उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.संतोष गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. कलप्पा पुजारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









