दसरा मेळाव्यात मुख्यमंत्र्यांची ग्वाही : आरक्षण देण्यास सरकार कटिबद्ध
प्रतिनिधी/ मुंबई
मराठा आरक्षणावऊन जाती-जातींमध्ये द्वेष आणि संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न काही पक्ष करीत आहेत. अशा पक्षांपासून सावध राहण्याची गरज आहे. मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देण्यास सरकार कटिबद्ध आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत
लढणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आझाद मैदानात झालेल्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात दिली.
एकनाथ शिंदे यांच्या गटाला अधिकृत शिवसेना म्हणून मान्यता मिळल्यानंर त्यांचा पहिलाच दसरा मेळावा होता. तसेच मनोज जरांगे पाटील यांना दिलेली 40 दिवसांची मुदत कालच दसऱ्या दिवशी संपत होती. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे नेमके काय बोलतात याबाबत राज्यातील जनतेला आणि समस्त मराठ्यांना उत्सुकता होती. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा शेवटपर्यंत लढा देणार असल्याचे सांगत आरक्षणाबाबत मराठ्यांच्या आशा जिवंत ठेवल्या.
छत्रपती शिवाजी महारांजाची शपथ घेऊन सांगतो
मराठा आरक्षणाच्या मुद्याला हात घातल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे भावूक झाले. मराठा आरक्षणाचा प्रश्न सरकार गांभीर्याने हाताळत आहे, यावर विश्वास ठेवा असे सांगत ते व्यासपीठावर ठेवलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याकडे गेले व तेथे नतमस्तक झाले. छत्रपतींच्या साक्षीने त्यांच्या पुतळयाची शपथ घेऊन सांगतो, की मी मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देणारअसे ते म्हणाले.
यावेळी व्यासपीठावरील सर्व नेते उभे राहिले. त्यानंतर भाषण पुढे सुरू करताना मराठा तऊणांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलून कुटुंबाला वार्यावर सोडण्याच्या अविचार कऊ नये, अशी भावनिक साद मुख्यमंत्र्यांनी घातली. मराठा समाजाला न्यायालयात टिकणारे आरक्षण देणार आहे. त्यासाठी इतर कोणत्याही समाजावर अन्याय होऊ देणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. आरक्षणाबाबत सरकारने गठीत केलेली न्यायमूर्ती संदीप शिंदे यांची समिती अहोरात्र काम करीत आहे. सर्वोच्च न्यायालयातही क्युरेटीव्ह याचिका स्वीकारण्यात आल्याचा उल्लेख शिंदे यांनी केला.
आरक्षणाच्या माध्यमातून राज्यातील वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मला अडचणीत आणण्यासाठी अशांतता पसरविण्याचे काम केले जात आहे, असा आरोपही एकनाथ शिंदे यांनी केला.
उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत गौप्यस्फोट
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीसाठी कशी फिल्डिंग लावली ते जाहीरपणे सांगत त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांनी सावध राहावे, असा सल्ला दिला. शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवणार, असा बाळासाहेबांना शब्द दिल्याचे उद्धव ठाकरे नेहमी सांगायचे. आम्ही विचारात पडलो कुठल्या शिवसैनिकाला बसवणार? मात्र हे महाशय टुनकन उडाले आणि खुर्चीत जाऊन बसले. मागचे-पुढचे सगळे सोडले आणि म्हणाले मला कुठे व्हायचे होते मुख्यमंत्री? पवार साहेबांनी सांगितले. यांनी पवारांकडे दोन माणसे पाठवली होतीत आणि उद्धव ठाकरे यांच्या नावाची शिफारस करा अशी विनंती केली, असा गौप्यस्फोट एकनाथ शिंदे यांनी केला.
यांचे 2004 पासून मुख्यमंत्रीपदी बसायचे ठरले होते. मात्र जुगाड काही होत नव्हता. विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल येताच यांनी सांगितलं आम्हाला सगळे दरवाजे मोकळे आहेत. हे युतीत निवडणूका लढले आणि दुसरे दरवाजे कसेकाय शोधायला लागले, असा प्रश्नही शिंदे यांनी केला.









