गारगोटी / प्रतिनिधी
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मताचे आम्ही आहोत, मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यास शरद पवार पुढाकार घेणार असतील आणि प्रामाणिक प्रयत्न करणार असतील तर आम्ही त्यांच्या पाठीशी राहू, असे मत आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. खानापूर ता भुदरगड येथे आज आ पाटील आले होते.
यावेळी भुदरगड तालुका सकल मराठा समाज, अखिल भारतीय मराठा महासंघ, भुदरगड तालुका शाखेच्या वतीने निवेदन देण्यात आले. बहुतांशी मराठा समाज हा गरीब आहे, समाजला फडवणीस सरकारनें आरक्षण मिळवून दिले, सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यास आताचे ठाकरे सरकार अपयशी ठरले आहे, पण मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यास उशीर झाला असला तरी उशिरा का होईना उत्तर आयुष्यत शरद पवार यांनी प्रयत्न करावा, त्यांच्या पाठीशी आम्ही उभे राहू, असे पाटील म्हणाले.
Previous Article‘गोकुळ’चं झालं, आता काँग्रेस म्हणून एकत्रच !
Next Article १५ जूनपर्यंत निर्बंध कायम









