ऑनलाईन टीम / मुंबई :
मराठा आरक्षणावरुन राज्यात वातावरण चांगलेच तापले आहे. मराठा आरक्षण समितीच्या वतीने मराठा आरक्षणासह उद्या, शनिवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. मात्र सरकारने अनेक मागण्या मान्य केल्याने उद्याचा बंद मागे घेत असल्याची माहिती मराठा सकल महासंघाचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी दिली आहे.
सुरेश पाटील म्हणाले, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर बंद मागे घेण्यात आला आहे. या संदर्भात काल रात्री उशीरा सह्याद्री अतिथीगृहावर बैठक झाली. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री अशोक चव्हाण, अनिल परब, विजय वडेट्टीवार उपस्थित होते.
पुढे ते म्हणाले, काल रात्री उशीराने बैठक झाली. सरकारने अनेक मागण्या मान्य केल्या आहेत. त्यामुळे उद्या पुकारण्यात आलेला बंद मागे घेत आहोत.