हातकणंगले येथे राजमाता जिजाऊ कोविड सेंटरचे लोकार्पन संपन्न
हातकणंगले / प्रतिनीधी
मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत राज्य सरकारने नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली असून याबाबत लवकरच निर्णय होईल असे प्रतिपादन राज्याचे आरोग्य राज्यमंत्री ना. डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले ते हातकणंगले येथील रघु जानकी संस्कृतीक भवन येथे नव्याने सुरू झालेल्या राजमाता जिजाऊ कोविड केअर सेंटरच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते, या वेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, कोविड १९ सारखा आजार परदेशातून आपल्या ग्रामिण भागापर्यंत येऊन पोहचला आहे, प्रशासनाकडून याबाबत सर्व उपाययोजना राबवल्या जात आहेत.
वाढणाऱ्या रुग्ण संख्येमुळे प्रशासन व आरोग्य विभागावर देखील ताण येत आहे. मात्र बऱ्याच सामाजिक संस्थांनी सुरवातीच्या काळापासुनच प्रशासनास सहकार्य केले आहे, कोव्हीड केअर सेंटरच्या माध्यमातून कोरोना रुग्णांची गैरसोय होणार नाही. याची काळजी आपण घेणार असून, लवकरच आपन कोरोना विरूध्दची ही लढाई जिंकू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी कोविड सेंटरचे मोहन मालवणकर यांनी राजमाता जिजाऊ कोविड सेटर बाबत माहिती दिली, कोरोना रूग्णांची होणारी गैरसोय लक्षात घेऊनच फक्त सामाजिक जाणीवेतून सर्वसामान्यांना परवडेल अश्या कोविड केअर सेंटरची उभारणी करत असल्याचे त्यांनी सांगीतले. यावेळी आम. प्रकाश आवाडे, मा आम. सुरेश हाळवणकर , मदन कारंडे , उपनगराध्यक्ष तानाजी पोवार , पोलीव उपअधिक्षक गणेश बिराजदार , जि प सदस्य विजय भोजे , सत्यंद्रराजे नाईक – निंबाळकर, पुंडलीक जाधवउपस्थित होते.
Previous Articleअंतिम दिवशी बाजार घसरणीसह बंद
Next Article टायर चोरणारी सात जणांची टोळी गजाआड









