प्रतिनिधी / कोल्हापूर
आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्यावतीने रविवारी राष्ट्रीय महामार्ग रोखण्याचा प्रयत्न झाला.यावेळी कार्यकर्त्यांनी आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, कोण म्हणते देत नाही घेतल्याशिवाय राहात नाही, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. नीटची परीक्षा असल्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास नको यासाठी अकरा वाजताचे आंदोलन बारा वाजता करण्यात आले.
आंदोलकांनी महामार्ग रोखण्याचा प्रयत्न करताच आंदोलक व पोलिसांमध्ये झटापट झाली. पोलिसांनी सर्व आंदोलकांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई करत काही कालावधीनंतर त्यांना सोडून दिले. तसेच यावेळी आरक्षणाचा प्रश्न जोपर्यंत मार्गी लागत नाही तोपर्यंत मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या नुकसानाची जबाबदारी राज्य शासनाने घ्यावी. त्याचबरोबर पुढील काळात होणाऱ्या सर्व शासकीय नोकर भरतीच्या प्रक्रिया थांबवाव्यात.या संदर्भातील आदेश पुढील दोन दिवसात सरकारने काढावा. अन्यथा आणखी तीव्र स्वरूपात आंदोलन करत पहिल्या टप्प्यात मुंबईला होणारा दूध पुरवठा बंद करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









