निर्णय घ्या अन्यथा किल्ले रायगडवरून आंदोलनाला प्रारंभ : खासदार छत्रपती संभाजी राजे यांचा राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा : तीन महत्वपूर्ण पर्याय आणि अनेक मागण्या केल्या सादर
प्रतिनिधी / मुंबई, कोल्हापूर
मराठा आरक्षण कायदा 5 मे रोजी रद्द झाल्यानंतर राज्यातील मराठा समाजात प्रचंड संताप, रोष आणि खदखद आहे. अशा स्थितीत दुखावलेला, संतापलेला मराठा समाज केव्हाही रस्त्यावर उतरू शकतो. पण आतापर्यंत मी त्याला थोपवले आहे. आरक्षणाच्या प्रश्नात राज्य सरकारने तातडीने पावले उचलावीत. मी सूचविलेले तीन पर्याय आणि इतर मागण्या 6 जून पर्यंत पूर्ण कराव्यात अन्यथा शिवराज्याभिषेक दिनी स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडवरून मराठय़ांच्या आंदोलनाला सुरू करण्यात येईल, असा खणखणीत इशारा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी शुक्रवारी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारला दिला. राज्यातील सत्ताधारी आणि विरोधाकांनी मराठा आरक्षणावरून राजकारण करू नये, असा सल्ला देताना त्यांनी 6 जून नंतर आपण कोरोना बिरोना पाहणार नाही, अशा शब्दात राज्य सरकारला सुनावले.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर अस्वस्थ झालेल्या मराठा समाजाला दिलासा देण्यासाठी संभाजीराजे यांनी राज्यव्यापी दौरा सुरू केला होता. या दौऱयात मराठा समाजातील कार्यकर्ते, पदाधिकारी, विचारवंत, तज्ञ यांची मते, भावना जाणून घेतल्यानंतर संभाजीराजे यांनी विविध राजकीप पक्षांच्या नेत्यांच्याही भेटी घेतल्या. त्यानंतर त्यांनी शुक्रवारी सायंकाळी मुंबई मराठी पत्रकार संघात पत्रकार परिषद घेऊन अस्वस्थ समाजाचा घुसमटत असलेला संताप प्रसार माध्यमांसमोर व्यक्त केला. त्यावेळी मराठा समाजाचे सर्व जिह्यांचे समन्वय उपस्थित होते.
कोणत्याही राजकीय पक्षाच्या विरोधात नाही
संभाजीराजे यांनी ते कोणत्याही पक्षाच्या विरोधात वा कोणताही राजकीय अजेंडा घेऊन आले नसल्याचे स्पष्ट केले. सकल मराठा समाजाला न्याय मिळावा हेच आपले ध्येय असून, 2007 पासून महाराष्ट्र पिंजून काढला आहे. अठरापगड जातीजमातीचे नेतफत्व करणाऱया तसेच बहुजन समाजाचे राजे असलेल्या छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या महाराष्ट्रात मराठा समाजावर अन्याय होतोय, त्याविरोधात हा लढा आहे, असे म्हणाले.
कोविडचा काळ आहे….जगू तर लढू
सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती गायकवाड समितीचा अहवाल अवैध ठरला आहे. मराठा समाज आरक्षण रद्द झाले. त्यावेळीच मराठा समाज संतफ्त झाला. पण जगू तर पुढे लढूफ या तत्त्वानुसार कोविड काळात कोणताही उद्रेक करायचा नाही. सामंजस्याची भूमिका घ्यायची. आपण जगलो तर पुढे निकराचा लढा देऊ हे समाजाच्या लोकांना पटवून दिले. म्हणून मराठा समाज अजूनपर्यंत शांत आहे, असे स्पष्ट करत संभाजीराजे म्हणाले, मी शांत आहे, माझ्या मवाळ भूमिकेविषयी अनेकांनी प्रश्न उपस्थित केले. पण कोरोनाच्या काळात मराठा बांधवांना संकटात लोटणे योग्य नव्हते, असेही त्यांनी सांगितले.
सत्ताधारी-विरोधकांनी मराठय़ींना वेठीस धरू नये
मराठा समाज शांत राहिला तरी लगेचच सत्ताधारी आणि विरोधकांत आरोप-ात्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या. सत्ताधारी म्हणतात पूर्वीचा कायदा खराब होता, विरोधी पक्ष म्हणतो यांनी बाजू नीट मांडली नाही म्हणून मराठा समाजाचे नुकसान झाले. पण मराठा समाजाला तुमच्या भांडणात रस नाही. आमचे मागणे एकच आहे की, मराठा समाजाला तुम्ही न्याय मिळवून द्या. तुम्ही मराठय़ांना वेठीला धरू नका, अशा शब्दात संभाजीराजे यांनी सत्ताधारी आणि विरोधकांना सुनावले.
संभाजीराजेंनी सुचविलेले तीन पर्याय
संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर उपाय म्हणून राज्य सरकारला तीन पर्याय सुचवले आहेत. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी एकत्रपणेच यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे नमूद केले.
1) मराठा आरक्षण प्रश्नी फेरविचार याचिका (रिह्यू पिटिशन) दाखल करायला हवी. मात्र तो केवळ देखावा नसावा, तर ती फूलप्रूफ याचिका असावी.
2) जर फेरविचार याचिका (रिह्यू पिटिशन) टिकली नाही, तर क्युरेटिव्ह पिटिशनचा दुसरा पर्याय आहे. जो अपवादात्मक परिस्थितीत शेवटचा पर्याय म्हणून वापरायचा असतो. पण राज्य सरकारने पूर्ण तयारीनिशीच फेरविचार याचिका दाखल करावी.
3) कलम 342 अ च्या माध्यमातून राज्य सरकार आपला प्रस्ताव राज्यपालांच्या माध्यमातून केंद्राकडे देऊ शकते. मात्र राज्यपालांकडे प्रस्ताव देताना पूर्ण डाटासह द्यावा लागेल. राज्यपालांच्या माध्यमातून तो राष्ट्रपतींकडे जाईल, तिथून ते केंद्रीय मागास वर्गीय आयोगाकडे जाईल, तिथून तो प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळाकडे जाईल.
संभाजीराजेंनी केलेल्या महत्वपूर्ण मागण्या
1) मराठा समाजातील 2,185 जणांना 9 सफ्टेंबर 2020 पूर्वी नियुक्त्या मिळाल्या आहेत. त्यांना सेवेत रुजू करून घेणे. 2) राजर्षी शाहू महारांच्या नावाने चालवल्या जाणाऱया सारथी संस्थेला स्वायत्तता द्या. या संस्थेला 1 हजार कोटी रुपये द्या आणि या संस्थेचे काम व्यवस्थित चालावे म्हणून समाजात काम करणाऱयांना त्यात स्थान द्या. 3) अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून दिल्या जाणाऱया कर्जाची मर्यादा 25 लाख रूपये करा. 4) मराठा समाजातील वंचित मुलांसाठी पंजाबराव देशमुख वसतिगृह योजनेतून प्रत्येत जिह्यात वसतिगफह उभारा. 5) मराठा समाजातल्या 70 टक्के गरीबांना लोकांना सवलती द्या.
तर 6 जूनला रायगडवरून आंदोलनाला प्रारंभ
मराठा आरक्षणाबाबतच्या फेरविचार याचिकेची तयारी आणि महत्त्वाच्या मागण्यांबाबत 6 जूनपर्यंत निर्णय झाला नाही, तर त्याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकदिनी मराठय़ांच्या पुढील आंदोलनाचे बिगुल वाजविले जाईल आणि त्यांचे नेतफत्व आपण स्वत: करणार असल्याचे संभाजी राजे यांनी जाहीर केले. मात्र या वेळी जनतेला वेठीस धरणार नाही. तर आमदार-खासदारांना घेऊन रस्त्यावर उतरणार असल्याचे संभाजीराजे यांनी जाहीर केले.
70 टक्के गरीब मराठय़ांना न्याय द्या
संपूर्ण महाराष्ट्राच्या दौऱयात मराठा समाज अस्वस्थ, दुखी दिसला. संतफ्त मराठा बांधव प्रसंगी कायदाही हातात घेतील. या समाजातील 30 टक्के लोक सोडले, तर 70 टक्के लोक अत्यंत गरीब आहेत. ते अन्यायाविरोधात निश्चितच रस्त्यावर उतरतील. यापुढे मराठय़ांवर अन्याय खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा संभाजीराजे दिला.
राज्य सरकारने दोनदिवसीय्य विशेष अधिवेशन बोलवावे
राज्य सरकारने दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवावे आणि त्यात आरोपप्रत्यारोप न करता मराठा समाजासाठी काय करणार? हे जाहीर करावे. त्या मराठा आरक्षण विषयावरच चर्चा व्हावी, अशी मागणी संभाजीराजेंनी केले.
बहुजनांची इच्छा असेल तर. नवा पक्ष काढणार
मराठा आरक्षण लढय़ातून आणि आंदोलनाच्या माध्यमातून आपण नवा पक्ष काढणार का? या प्रश्नावर संभाजीराजे म्हणाले, हा लढा पक्षविरहित आहे. पण बहुजन समाजाची इच्छा असेल तर पुढे पाहता येईल, असे सूचक विधानही त्यांनी केले.
राजकीय नुकसान झाले तरी पर्वा नाही
मराठा आरक्षणाच्या लढय़ात मी सत्ताधारी, विरोधकांना अंगावर घेतले आहे. त्याचे राजकीय, सामाजिक परिणामही होणार आहेत. पण मला त्याची पर्वा नाही. मला चिंता माझ्या मराठा समाजाची, बहुजन समाजाची आहे, असेही संभाजीराजे यांनी सांगितले.
मराठय़ांचे मतदान नको म्हणून सांगा मग बघतो
सत्ताधारी आणि विरोधकांनी मराठा समाजाचे मतदान नको असे जाहीर करावे, मग मी त्यांना पाहतो, असा दमही संभाजीराजे यांनी भरला.
आरक्षणाच्या लढय़ाला साथ द्या, हात जोडून विनंती करतो
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर कालपासून अनेक नेत्यांच्या भेटी घेत आहोत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनसेप्रमुख राज ठाकरे, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, उपसमितीचे अध्यक्ष अशोकराव चव्हाण यांच्या भेटी घेतल्या आहेत. प्रकाश आंबेडकर यांची भेट घेणार असल्याचे सांगून संभाजी राजे यांनी मराठा आरक्षणाच्या लढय़ाला एकत्रित साथ देण्याची हात जोडू विनंती केली.
संभाजीराजे म्हणाले………..
- ओबीसींमध्ये मराठय़ांसाठी नवा प्रवर्ग निर्माण करून देता येऊ शकतो का, हे सरकारने सांगायचे आहे.
राजर्षी शाहू महाराजांनी बहुजन समाजाला आरक्षण दिले. वंचितांना आरक्षण दिले. - मराठा समाजाला आरक्षण द्या, असे बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. मग आताच मराठा समाजावर अन्याय का?
- 342 ए कलमाची माहिती देण्यासाठी 9 ऑगस्ट या ाढांतिदिनी दिल्लीत सर्व पक्षीय खासदारांची गोलमेज परिषद घेणार.
-मान-सन्मान गेला खड्डय़ात माझ्या गरीब मराठय़ांना आरक्षण द्या
-मराठा समाजाचा शिपाईगडी म्हणून मी त्यांच्या भावना मांडत आहे.
-सारथीवर मराठय़ांच्या प्रतिनिधींची नियुक्ती करा
-सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा आदर करतो









