सर्वपक्षीय खासदारांच्या प्रतिनिधींसह साधणार संवाद : मराठा समाजाच्या अडचणी, प्रश्न मांडणार
प्रतिनिधी / कोल्हापूर
मराठा आरक्षणाचा प्रश्न आणि मराठा समाजाच्या व्यथा, अडचणी आणि भावना मांडण्यासाठी खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील सर्व पक्षीय खासदार प्रतिनिधींचे शिष्टमंडळ राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची गुरूवारी 2 सप्टेंबर रोजी भेट घेणार आहे. खासदार संभाजीराजे यांनी राष्ट्रपती कोविंद यांच्याकडे मराठÎांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी वेळ मागितली होती. त्यानंतर राष्ट्रपती कार्यालयाकडून वेळ देण्यात आली होती.
राष्ट्रपती कोविंद यांची भेट घेऊन चर्चा करण्यासाठी खासदार संभाजीराजे यांनी महाराष्ट्रातील चारही प्रमुख पक्षांना त्यांचे प्रतिनिधी पाठविण्याचे आवाहन केले होते. संभाजीराजेंच्या या आवाहनास प्रतिसाद देऊन शिवसेना खासदार विनायक राऊत, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण, भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर व कॉंग्रेसतर्फे राज्यातील एकमेव खासदार बाळू धानोरकर हे आजारी असल्याने आमदार संग्राम थोपटे हे त्यांच्या पक्षाचे प्रतिनिधी म्हणून शिष्टमंडळात सहभागी असणार आहेत.
छत्रपती संभाजीराजे हे सुरूवातीपासून मराठा आरक्षण लढÎात सक्रीय असून रस्त्यावरील आंदोलनांपासून ते न्यायालयीन लढाईपर्यंत सर्व स्तरांवर ते प्रयत्नशील राहिले आहेत. मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविण्याची जबाबदारी कुण्या एकाची नसून सर्व पक्षांनी एकत्र येऊन यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याची गरज संभाजीराजेंनी वेळोवेळी बोलून दाखवली आहे. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पक्षीय हेव्यादाव्यांच्या पलीकडे जाऊन संभाजीराजे मोट बांधत आहेत.