आ. संभाजी पाटील यांचे नेतृत्व निलग्यापुरतेच, समाज माध्यमांवर सक्रिय
प्रतिनिधी / लातूर
मराठवाडा पदवीधर मतदार संघात राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण यांनी हैट्रीक केली आहे. भाजपाचे उमेदवार शिरिष बोराळकर पहिल्या फेरीपासून पिछाडीवर होते. जवळपास एकोणसाठ हजार मतांनी त्याचा पराभव झाल्याने मराठवाड्यात भाजपाने महाराष्ट्राची संपूर्ण फळी मैदानात उभारुणही स्पर्धा चुरशीची देऊ शकली नाही. यावरून मराठवाड्यात भाजपाची संघटनात्मक बांधणी किती पोकळ आहे हे सिद्ध झाले.
भाजपा नेतृत्त्वाने मराठवाड्याचे नेतृत्व करण्याची संधी आमदार संभाजी पाटील यांना दिली परंतु, त्यांचे नेतृत्व आता फक्त निलंगा मतदार संघापुरतेच सिमित असल्याचे बोलले जात आहे. लातुर जिल्ह्यात भाजपाने प्रचार यंत्रणा समाज माध्यमांवर सक्रिय राहिली तर प्रत्यक्षात कोणताही पक्षाचा पदाधिकारी जमिनीवर दिसला नाही कि मतदारांशी संपर्क केला नाही. मतदार पर्यंत पोलचीट पोहचली नाही असे विचारले तर मोबाईल प्रचाराच्या जमान्यात पोलचीट गरज काय प्रश्न भाजपा पदाधिकारी उपस्थित करीत होते. मराठवाड्यात भाजपाचा दारूण पराभव झाल्याने पक्षात मोठ्या प्रमाणावर नाराजी पसरली आहे.
पदवीधर मतदार संघात मोठ्या प्रमाणावर मते बाद होण्याचे प्रमाण अधिक असल्याने पदवीधराच्या शैक्षणिक गुणवत्तेवर प्रश्र्न चिन्ह उपस्थित झाले आहे.









