औंध /प्रतिनिधी
सर्बिया येथे होणाऱ्या जागतिक कुस्ती चषक स्पर्धेसाठी मराठमोळा मल्ल जागतिक पदक विजेता डीवायएसपी राहुल आवारे याची 61 किलो वजनगटात फ्रीस्टाईल मध्ये निवड झाली आहे. जग जिंकायला निघालेल्या राहूलच्या कामगिरीकडे कुस्तीशौकिनांच्या नजरा लागल्या आहेत.
पाटोदा (बीड) येथील सुपुत्र राहुल आवारे याने आंतरराष्ट्रीय स्तरावर कुस्ती मध्ये आपल्या कर्तबगारीने ठसा उमटवला आहे. राष्ट्रकुल, काँमनवेल्थ, एशियन चँम्पियनशिप, आणि 2019 साली वॅल्ड चँम्पियनशिप स्पर्धेत राहूलने पदक जिंकून महाराष्ट्राचा झेंडा सातासमुद्रापार फडकावला आहे. राहुलच्या दैदिप्यमान कामगिरीची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने त्याची उपविभागीय पोलीस अधीक्षक पदावर नियुक्ती केली आहे. नाशिक येथे दोन वर्षाचे खडतर प्रशिक्षण संपवून राहुल नुकताच पुणे जिल्हा ग्रामीण विभागाची सुत्रे हाती घेतली आहेत.
सर्बिया येथे होणाऱ्या 17 आणि 18 डिसेंबर अखेर होणाऱ्या जागतिक चषक कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय कुस्ती संघात फ्रीस्टाईल प्रकारात 61 किलो वजनगटात राहुलने आपले स्थान निश्चित केले आहे. सोनिपत येथील सराव शिबीर संपवून तो आज सर्बियाला रवाना झाला आहे. राहुल आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे येथे अर्जूनवीर काकासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. जग जिंकायला गेलेल्या आपल्या सुपुत्राच्या कामगिरी कडे महाराष्ट्रातील तमाम कुस्तीशौकिनांच्या नजरा लागल्या आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









