प्रतिनिधी /बेळगाव
मराठा पंच कमिटीच्या सहकार्याने आयोजित मरगाई देवीची यात्रा सराफ गल्ली, शहापूर येथे साधेपणाने साजरी झाली. कोरोनाच्या नियमावलीमुळे केवळ गल्ली मर्यादीत होती.
पंच कमिटीचा जमा खर्च एकमताने मंजूर करण्यात आला. सूचक म्हणून हभप शंकर बाबली, सुभाष लाड यांनी सुचविले. याला कृष्णा लाड, सुनील बाबली, सुनील इंजल यांनी अनुमोदन दिले. पंच कमिटीच्या सूचनेनुसार नूतन यात्रा कमिटी नेमण्यात आली. याला सूचक म्हणून रमेश चौगुले व आनंद सुणगार यांनी अनुमोदन दिले.
नूतन कमिटीच्या अध्यक्षपदी रमेश चौगुले, उपाध्यक्ष आनंद सुणगार, सेपेटरी शंकर ताशिलदार, उपसेपेटरी बाळू डवरी, खजिनदार सुनील इंजल, उपखजिनदार राजू मंडोळकर, हिशोब तपासनीस शंकर बाबली, सुनील बाबली, सूरज नाईक यांची निवड करण्यात आली आहे.









