कंग्राळी बुद्रुक/ वार्ताहर
येथील मरगाईनगर येथे 7 नोव्हेंबरपासून सुरू असलेल्या मर्यादित षटकांच्या हाफ पीच नाईट क्रिकेट स्पर्धेत गुरुवार दि. 25 रोजी झालेल्या अंतिम सामन्यात ओपन गटामध्ये पिरनवाडी येथील सनसेट वॉरियर्स संघाने प्रथम क्रमांकाचे 22,222 रुपयाचे पारितोषिक व चषकसह विजेतेपद मिळविले. तर शौर्य स्पोर्टस् बेळगाव संघाने द्वितीय क्रमांकाचे 11,111 रुपयाचे पारितोषिक व चषक मिळविले.
गावमर्यादित गटामध्ये गणेश चौक कंग्राळी बुद्रुक या संघाने प्रथम क्रमांकाचे 7000 रुपयाचे पारितोषिक व चषक मिळविले तर मोरया स्पोर्टस बाहेर गल्ली या संघाने द्वितीय क्रमांकाचे 3000 रुपयाचे पारितोषिक व चषक मिळविले. त्याचबरोबर वैयक्तिक इतर बक्षिसे होती. वितरण समारंभावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते मयूर बसरीकट्टी, मल्लाप्पा पाटील, ग्रा. पं. सदस्य नवनाथ पुजारी, मोहन भैरटकर यांच्या हस्ते त्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
सदर स्पर्धा भरविण्यासाठी ग्रा. पं. अध्यक्ष संध्या चौगुले, ग्रा. पं. सदस्य यल्लेजी पाटील, जयराम पाटील, तानाजी पाटील यांनी सहकार्य केले. या स्पर्धेत एकूण 94 संघांनी भाग घेतला होता. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी राहुल सागर, संदीप पाटील, पवन राजोरी, अनिकेत भेकणे, कलमेश सुतार, आकाश सुतार, महेश कोळी, सुभाष पाटीलस इतर मरगाई स्पोर्टस्च्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.









