मयेत उत्साही वातावरण
डिचोली/ प्रतिनिधी
मये गावची ग्रामदेवता श्री महामाया देवीच्या कळसोत्सवाला मये गावात मोठय़ा उत्साहात प्रारंभ झाला. न्यायालयाच्या आदेशानुसार सदर उत्सव यावषीही साजरा करण्याची सुचना मामलेदारांनी दिल्यानंतर या उत्सवाला प्रारंभ झाला.
काल सोम. दि. 7 मार्च रोजी संध्याकाळी गावकरवाडा मये येथील श्री देवी महामाया मंदिरात पारंपरिक विधी पार पडल्यानंतर देवीचा कळस मंदिराबाहेर काढण्यात आला. नंतर अवसारी मोडासह कळस केळबाईवाडा येथील श्री देवी केळबाईच्या मंदिरात नेण्य आला. त्याठिकाणी पुजाअर्चा झाल्यानंतर कळसाचे श्री सातेरी मंदिरात आगमन झाले.
आजपासून (मंगळ. दि. 8) कळस मये गावातील भाविकांच्या घरोघरी फिरणार व पुढील मंगळवारी (दि. 15 मार्च) कळस पुर्ववत श्री महामाया मंदिरात विधीवतपणे प्रवेश करणार. व या उत्सवाची सांगता होणार आहे.
कळसोत्सवातील कथीत वादाचा अंदाज घेऊन मंदिर परिसरात पोलीस तैनात करण्यात आले होते. सदर उत्सव न्यायालयाच्या आदेशानुसार होणार असून सर्वां?नी सहकार्य करावे असे आवाहन मामलेदार लक्ष्मीकांत कुट्टीकर यांनी केले होते.









