बेंगळूर/प्रतिनिधी
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावरील झालेल्या कथित हल्ल्याबद्दल बोलताना माजी पंतप्रधान आणि जनता दल-एस नेते एचडी देवगौडा यांनी चिंता व्यक्त केली आहे. ममता बॅनर्जी यांच्या प्रकृतीवर चिंता व्यक्त करत त्यांनी लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
एका ट्वीटमध्ये माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मी माझ्या बहिणीची आणि सहकारी बॅनर्जी यांच्या प्रकृतीची काळजी करीत आहे आणि त्या लवकर बऱ्या व्हाव्यात त्यांना चांगले आरोग्य मिळावे अशी मी शुभेच्छा देतो. देवेगौडा यांनी आम्ही सर्वांनी निवडणुका लढताना आणि हरताना पाहिले आहेत परंतु लोकशाहीला काळिमा फासण्याचा घटना चुकीच्या आहेत. मला आशा आहे की सर्व बाजूंनी संयम ठेवला जाईल.
निवडणूक आयोगाला गाभीर्याने दखल घेण्याचे आवाहन
ममता बॅनर्जी यांच्यावरील हल्ल्यानंतर माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनीही हल्ल्याच्या बातमीने नाराज असल्याचे सांगितले. बॅनर्जी यांना त्वरित बरे होण्यासाठी शुभेच्छा देत निवडणूक आयोगाला या विषयाकडे गांभीर्याने विचार करण्याचे आवाहन केले.
सध्या रुग्णालयात दाखल असलेल्या ममता बॅनर्जी यांनी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला तेव्हा त्यांच्यावर नंदीग्राममध्ये हल्ला झाल्याचा आरोप केला होता, त्यामुळे त्यांच्या पायाला दुखापत झाली आहे. दरम्यान पश्चिम बंगाल पोलिसांनी ममता ज्या घटनेत जखमी झाल्या, ती घटना हा हल्ला नव्हता, तर अपघातच होता असे म्हंटले आहे.