ऑनलाईन टीम / कोलकाता :
पश्चिम बंगाल विधानसभेत प्रचंड बहुमताने विजयी झाल्यानंतर ममता बनर्जींनी आज तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राजभवनातील टाऊन हॉटेलमध्ये राज्यपाल जगदीप धनखर यांनी बनर्जी यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
ममता बॅनर्जी यांनी बंगाली भाषेतून मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. इतर मंत्री नऊ मे रोजी शपथ घेणार आहेत. शपथविधीनंतर राज्यपाल धनखर यांनी ममता यांचे अभिनंदन करत बंगालमध्ये चाललेला हिंसाचार थांबवून शांतता आणि सुव्यवस्था स्थापन करण्यास सांगितले.









