ऑनलाईन टीम/तरुण भारत
पश्चिम बंगालमधील तीन मतदारसंघात गुरुवारी झालेल्या पोटनिवडणुकीत तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जींचा ५८ हजाराहून अधिक मतांनी विजयी झाला आहे. ममतांनी भाजपच्या प्रियांका टिबरेवाल यांचा ५८,८३२ मतांनी पराभव केला आहे.
भवानीपूर विधानसभा मतदारसंघात पार पडत असलेल्या पोटनिवडणुकीत ममता बॅनर्जी यांचा विजय निश्चित मानला जात होता. अखेर ममतांनी बाजी मारत भाजपच्या प्रियांका टिबरेवाल यांचा ५८ हजाराहून अधिक मतांनी पराभव केला. निकालानंतर ममता बॅनर्जी यांच्या समर्थकांनी विजयी जल्लोषाला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्तरावर ममता बॅनर्जी यांचं वजन वाढणार हे निश्चित आहे. आता त्यांची नजर ही २०२४ च्या लोकसभा निवडणुकीवर असणार आहे. समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी ममता बॅनर्जी यांच्या विजयाचं स्वागत केलं आहे.