प्रतिनिधी/ बेळगाव
पत्रकारितेमधील अर्ध शतक पूर्ण केल्याबद्दल दै. रणझुंझारचे संपादक मनोहर कालकुंद्रीकर यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते वर्षा बंगल्यावर झालेल्या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. यावेळी मंत्री एकनाथ शिंदे, छगन भुजबळ यांनीही त्यांना शुभेछा दिल्या.
या कार्यक्रमप्रसंगी मंत्री सुभाष देसाई, जनसंपर्क खात्याचे संचालक आंबेकर, मनोज कालकुंद्रीकर, सुहास हुद्दार, राजेंद्र पवार, कोल्हापूरचे जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते आदी उपस्थित होते. याच कार्यक्रमात दैनिक वार्ताच्या संपादक क्रांती हुद्दार व दैनिक स्वतंत्र प्रगतीच्या संपादक बबिता पोवार या महिला पत्रकारांचाही गौरव करण्यात आला.









