आंबेशेत येथे गळफासाने संपवले जीवन
प्रतिनिधी/ रत्नागिरी
रत्नागिरी प्रादेशिक मनोरूग्णालय येथे कार्यरत असलेल्या कर्मचाऱयाने गळफास घेवून आत्महत्या केल़ी संतोष सुरेश नागवेकर (45, उत्कर्षनगर कुवारबाव) असे मृताचे नाव असून शनिवारी सकाळी त्यांचा मृतदेह शहरालगतच्या आंबेशेत येथील आंबा बागेत आढळून आल़ा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष नागवेकर हे मागील 3 दिवसांपासून घरातून बेपत्ता होत़े शनिवारी सकाळी 11 च्या सुमारास आंबेशत येथे नागवेकर यांचा मृतदेह काजूच्या झाडाला नायलॉनच्या दोरीने गळफास घेतलेल्या स्थितीत स्थानिकांच्या निदर्शनास आल़ा याची खबर पोलीस पाटील लिमये यांनी शहर पोलिसांत दिल़ी नागवेकर यांचा मृतदेह कुजण्याची प्रक्रिया सुरू झाली होत़ी त्यामुळे त्यांनी दोन-तीन दिवसांपूर्वी आत्महत्या केली असावी, अशी शक्यता वर्तवण्यात आली आह़े दरम्यान नागवेकर यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाह़ी या प्रकरणी पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल पालांडे करत आहेत़









