ऑनलाइन टीम / मुंबई :
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या मनोरंजनासाठी नव्वदीच्या दशकातील लोकप्रिय मालिका रामायण व महाभारत यांचे पुनर्प्रसारण करण्याचा निर्णय दूरदर्शनकडून घेण्यात आला आहे.
लॉकडाऊनच्या काळात या मालिकांचे पुन्हा प्रसारण करण्यात यावे, अशी मागणी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात होत होती. त्याची दखल घेण्यात आली आहे. या मागणीवरून या मालिकांचे आता पुन्हा प्रसारण करण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय प्रसारक खात्याकडून देण्यात आली. मात्र, या मालिका कधीपासून व किती वाजता प्रक्षेपित होणार याचा निर्णय अजुन झालेला नाही.
विशेष म्हणजे अलीकडेच रामायणातील सर्व कलाकारांनी ‘द कपिल शर्मा शो’मध्ये हजेरी लावली होती. यामध्ये या कलाकारांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला होता.









