अमेझॉन प्राइम व्हिडिओवर ‘द फॅमिली मॅन 2’नंतर मनोज वाजपेयी आता नेटफ्लिक्सचा चित्रपट ‘रे’मध्ये दिसून येणार आहेत. सत्यजीत रे यांच्या कथांवर आधाति हा एक एंथोलॉजी चित्रपट असून यात चार विविध कथांचे चार दिग्दर्शकांनी दिग्दर्शन पेले आहे. याच्या एका कथेत मनोज वाजपेयी गझल गायकाच्या भूमिकेत दिसून येणार आहेत.
नेटफ्लिक्सने मंगळवारी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. ट्रेलरमध्ये चारही कथा आणि प्रमुख व्यक्तिमत्त्वांची ओळख करून देण्यात आली आहे. मनोज वाजपेयी यांच्यासह के.के. मेनन, अली फजल आणि हर्षवर्धन कपूर चार विविध कथांचे प्रतिनिधित्व करत आहेत.
मनोज यांच्या कथेचे शीर्षक ‘हंगामा हे क्यों बरपा’, के.के. मेनन यांच्या कथेचे शीर्षक ‘बहरुपिया’, अली फजल यांच्या कथेचे ‘फॉरगेट मी नॉट’ तर हर्षवर्धन यांच्या कथेचे शीर्षक ‘स्पॉटलाईट’ आहे. या सर्व कथा भारतीय चित्रपटसृष्टीचे पितामह सत्यजीत रे यांच्या कथांचे चित्रपटातील रुपांतरण आहे. श्रीजीत मुखर्जी, अभिषेक चौबे आणि वासन बाला यांनी याचे दिग्दर्शन पेल आहे. 25 जून रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.









