ऑनलाईन टीम / मुंबई
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची मनी लॉड्रिंग आणि भ्रष्टाचार प्रकरणी ईडी कडून चौकशी सुरु आहे. ईडी कडून देशमुखांना याआधीही अनेकवेळा समन्स बजावण्यात आले आहेत. मात्र देशमुख चौकशी दरम्यान बऱ्याचदा गैरहजर राहिले आहेत. यातच त्यांनी या चौकशीप्रकरणी गंभीर आरोप करत ईडीविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.
देशमुखांनी ईडीविरोधात हायकोर्टात याचिका दाखल करत ईडी कडून बजावण्यात आलेले समन्स रद्द करण्याची मागणी केली आहे. तपासयंत्रणा केवळ खळबळ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असून महत्वाची कागदपत्रं लीक केली जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. कोर्टाने याप्रकरणी सोमवारपर्यंत निकाल राखीव ठेवला आहे.
अनिल देशमुखांच्यावतीने वकील विक्रम चौधरी युक्तिवाद करत असून अमन लेखी यांच्यासह एसजी तुषार मेहता, एएसजी अमन लेखी आणि एएसजी अनिल सिंह अशी वकिलांची तगडी फौज ईडीची बाजू मांडत आहेत.
अनिल देशमुखांना तातडीने दिलासा देण्याची गरज असल्याचं असल्याचं देशमुखांच्या वतीने सांगण्यात आलं असून तपास यंत्रणेच्या चौकशीची गरज काय? याची माहिती देत नाहीये, तपासयंत्रणेनं अद्याप ECIR ची कॉपी दिलेली नाही. या प्रकरणानं तपासयंत्रणा केवळ माध्यमांद्वारे खळबळ निर्माण करू पाहतंय, असा आरोपही केला आहे. तर अनिल देशमुखांच्या याचिकेच्या वैधतेवरच सरकारी पक्षाचा आक्षेप आहे. अशाप्रकारे ही याचिका एकलपीठापुढे मांडली जाऊ शकत नाही, या याचिकेवर खंडपीठापुढे सुनावणी व्हायला हवी, असा युक्तिवाद सॉलिसटर जनरल तुषार मेहता यांनी केला आहे.
Previous Articleसांगली : स्थायी सभापतीपदी भाजपाचे निरंजन आवटी
Next Article बेळगाव सार्वजनिक गणेशोत्सव मंडपासाठी परवानगी








