वृत्त संस्था/ होस्टन (अमेरिका)
येथे सुरू असलेल्या 2021 विश्व टेबल टेनिस स्पर्धेत भारताची महिला टेबल टेनिसपटू मनिका बात्राने दुहेरीत उपांत्यपूर्व फेरी गाठली. महिलांच्या दुहेरीत तसेच मिश्र दुहेरीत मनिकाने शेवटच्या आठ खेळाडूंत स्थान मिळविले आहे.
महिलांच्या दुहेरीतील झालेल्या सामन्यात मनिका बात्रा-अर्चना कामत यांनी हंगेरीच्या मॅडेरेझ-पोटा यांचा 11-4, 11-9, 6-11, 11-7 अशा 3-1 गेम्स्मध्ये पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली. मिश्र दुहेरीच्या सामन्यात मनिका बात्रा-साथियान जी. यांनी चीनच्या वेंग मेनू आणि अमेरिकेच्या कनक झा यांचा 3-2 अशा फरकाने (15-17, 10-12, 12-10, 11-6, 11-7) असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले.









