प्रतिनिधी / मुंबई
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी महाराष्ट्रातील डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी १००० पीपीई किट्स आणि मास्क डॉक्टरांच्या ‘मार्ड’ संघटनेकडे सुपूर्द केले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्वीटरवरून याबद्दल माहिती दिली. राज ठाकरे म्हणाले, डॉक्टर्स ज्यापद्धतीने जीवावर उदार होऊन महाराष्ट्राची सेवा करत आहेत त्याबद्दल माझ्या कुटुंबच्या वतीने मी डॉक्टरांचे आभार मानू इच्छितो. या मदतीबद्दल मार्डने अमित ठाकरे यांचे आभार मानले आहेत.









