सावंतवाडी / प्रतिनिधी-
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जिल्हा मनसेतर्फे सावंतवाडी पत्रकार संघटनेला सोमवारी सावंतवाडीतील पत्रकार कक्षात मास्क, सॅनिटायझर आणि ऑक्सिमीटरचे वाटप करण्यात आले. यावेळी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष प्रवीण मांजरेकर, राजेश मोंडकर, अॅड. संतोष सावंत, हरिश्चंद्र पवार, विजय देसाई, प्रसन्न राणे, रामचंद्र कुडाळकर, जतीन भिसे, दीपक गावकर आदी उपस्थित होते. तर मनसेच्यावतीने जिल्हाध्यक्ष धीरज परब, तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे, अॅड. अनिल केसरकर, राजू कासकर आणि मनसे कार्यकर्ते उपस्थित होते. अखिल भारतीय पत्रकार परिषद सिंधुदुर्ग जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदी निवड झाल्याबद्दल हरिश्चंद्र पवार यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.










